👉 जलद fat loss साठी पाच सर्वोत्तम व्यायामप्रकार | Fast Fat Loss Top 5 Exercises In Marathi 2021subscribe करा fitness & nutrition कट्टा चॅनलला व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा fitness & Nutrition क्षेत्रातील माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम बघण्यासाठी.

तर फ्रेंड्स मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की इफेक्टिव्ह fat loss होण्यासाठी
आपला आहार व दिनचर्या कशी असावी.

आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत असे कोणते पाच व्यायाम प्रकार आहेत ज्याच्यामध्ये progressively उत्तम प्रकारे आपला fat loss होइल.

तर फ्रेंड्स तुम्हाला तर माहिती आहेचे फिटनेस क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे ट्रेंड्स बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटीज घेऊन आले आहेत. पण खरोखरच याचा फायदा तुम्हाला झाला आहे का ?

उदाहरणार्थ झुंबा ,एरोबिक्स ,पॉवर योगा इत्यादी. आमचे असे प्रामाणिक मत आहे की या व्यायाम प्रकारांचा प्रारंभिक fat loss करिता थोडा फार उपयोग होतो मात्र दीर्घकालीन उपाययोजना म्हणून या व्यायाम प्रकारांचा फारसा उपयोग होत नाही.यासाठी तुम्हाला तुमच्या शरीरातील बीएमआर वाढवणारे व्यायाम प्रकारच करणे अत्यंत आवश्यक आहेत तर ते top 5 व्यायाम प्रकार कोणते हे आता आपण progressively पाहूयात :

पाचव्या क्रमांकावर आहे own body weight exercise यालाच फंक्शनल ट्रेनिंग असेही म्हणतात. उदाहरणार्थ पुशअप्स, पुलअप्स , free squats इत्यादी. या व्यायाम प्रकारांनी तुमच्या स्नायूंना बळकटी येऊन तुम्ही पुढचे व्यायाम प्रकार करण्यासाठी तयार व्हाल .

स्नायूंमध्ये पुरेशी बळकटी आल्यानंतर आता आपण पुढे जे चार व्यायामप्रकार बघणार आहोत त्या व्यायाम प्रकारांनी तुमचा बीएमआर रेट सुधारून तुमच्या खऱ्या fat loss ची सुरुवात होणार आहे.

नंबर चारला हे केटलबेल वर्कआऊट हा एक रशियन व्यायाम प्रकार असून यामध्ये हँडल असलेल्या निरनिराळ्या वजनाच्या धातूच्या गोळ्यांचा विविध व्यायाम प्रकारांसाठी उपयोग केला जातो.या व्यायाम प्रकाराची फारशी माहिती लोकांपर्यंत पोहोचलेली नसल्यामुळे हा व्यायामप्रकार चौथ्या क्रमांकावर आहे.

नंबर तीन वर आहे वजन खांद्यावर घेऊन मारलेल्या बैठका म्हणजेच back squat. या व्यायाम प्रकारामध्ये तुमच्या शरीरातील प्रत्येक स्नायूला कुठल्याना कुठल्या आधारे व्यायाम होऊन तुमचा बीएमआर वाढण्यास मदत होते.

नंबर दोनवर आहे Barbell Dead lift ही एक पॉवर movement आहे. ज्यामधे तुमच्या कमरेच्या स्नायूंना बळकटी मिळण्यास मदत होते.

व नंबर एकवर आहे बार्बेल Dynamic lunges वेत ट्रेनिंगमधील लोअर बॉडीचा हा एक महत्त्वाचा व्यायाम प्रकार आहे. या व्यायाम प्रकारामध्ये तुमच्या hip joint पासून ते knee joint पर्यंत असलेल्या सर्व स्नायूंचा व्यायाम होतो.शरीरातील बाकीच्या स्नायूंच्या तुलनेमध्ये legs व Hips चे muscles हे मोठे असल्यामुळे त्यांना दिलेला व्यायाम हा शरीरातील बीएमआर वाढवण्याकरिता जास्त उपयुक्त ठरतो, व ज्यामुळे इफेक्टिव्ह fat loss जलदगतीने होण्यास मदत होते.

वरील प्रकारचे व्यायाम करताना हाय ब्लड प्रेशर, लोअर बॅक पेन असलेले व्यक्ती डायबिटीस patients इत्यादी लोकांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच हे व्यायामप्रकार करावेत.

तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओतून जर तुम्हाला नवीन काही माहिती शिकायला मिळाली असेल तर हा व्हिडिओ जरूर लाइक करा व तुमच्या फॅमिली अँड फ्रेंड्सबरोबर शेअर करायला विसरू नका धन्यवाद .

Images Credit :
http://www.menshealth.co.uk
https://imgur.com

marathi fitness tips
fitness nutrition katta
fitness motivation
marathi motivational video
marathi nutrition tips

One thought on “👉 जलद fat loss साठी पाच सर्वोत्तम व्यायामप्रकार | Fast Fat Loss Top 5 Exercises In Marathi 2021

  • December 31, 2020 at 10:44 am
    Permalink

    Sir , exercise karnyas motivate rahanyasathi kay karawa ? Tyavishayi info
    milala tar baghayla awdel

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ancient Japanese Tonic Melts 54 LBS Of Fat (Drink Daily Before 10am)
This is default text for notification bar